– जिल्हाधिकारी यांची माहिती
The गडविश्व
गडचिरोली, दि. २५ : जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील गणपूर येथील वैनगंगा नदीपात्रात नाव उलटुन ७ महिला व १ नावी वाहुन गेल्याची दुर्देवी घटना २३ जानेवारी रोजी घडली. या घटनेची शासनाच्या वतीने गंभीर दखल घेतली असून मृतकाच्या कुटुंबास प्रत्येकी ४ लाख रूपये आर्थीक मदत केली आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी संजय मिना यांनी दिली आहे.
चामोर्शी तालुक्यातील गणपूर येथील वैनगंगा नदीपात्रातुन काही महिला नावेच्या सहाय्याने चंद्रपूर जिल्हयातील देवटोक येथे मिरची तोडणीसाठी जात होत्या. नदीपात्रातील पाण्याची पातडी वाढल्याने काही अंतरावर नाव गेल्यानंतर उलटल्याची दुर्घटना घडली. त्यापैकी एका महिलेस व नावीकास वाचविण्यात यश आले होते. काल २४ जानेवारी पर्यंत तिन महिलांचा मृतदेह हाती लागला त्यात पुष्पाबाई मुक्तेश्वर झाडे, रेवंता हरिचंद्र झाडे, जिजाबाई दादाजी राऊत यांचा समावेश असुन त्यांना प्रत्येकी चाल लाख रूपायांचा धनादेश शासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेची घेतली दखल
चामोशी तालुक्यातील गणपूर येथील वैनगंगा नदीपात्रात नाव उलटल्याची दुर्देर्वी घटना घटना घडली आहे. मृतकांचा शोध घेण्याचे काम युध्दपातळीवर आहे. जिल्हा आणि पोलीस प्रशासनाशी आपण संपर्कात असुन एनडीआएफ आणि जिल्हा पोलीसांचा बचाव चमू तैनात करण्यात आल्या आहेत. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना विनम्र श्रध्दांजली. मृतांच्या कुटुंबीयास अर्थीक मदत देण्यात येईल. असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरव्दारे कळविले होते.
चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर गणवीर येथे बोट बुडून झालेल्या दुर्दैवी अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून, दोन महिलांना वाचविण्यात यश आले आहे. 5 महिला बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. जिल्हा आणि पोलिस प्रशासनाशी संपर्कात असून, एनडीआरएफ…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 23, 2024