– आरमोरी विधानसभा क्षेत्रात गावागावात जनजागृती
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि.२९ : भारत निवडणुक आयोगाने मोबाईल प्रात्यक्षिक व्हॅनद्वारे (MDV) नागरीकामध्ये जनजागृती करण्याकरीता आरमोरी विधानसभा मतदार संघात मोबाईल प्रात्यक्षिक व्हॅनद्वारे (MDV) केंद्रनिहाय निवडणुक कार्यक्रम घोषित होईपर्यंत जनजागृती कार्यक्रम कार्यरत ठेवण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार कुरखेडा तालुक्यातील कुंभिटोला येथे नुकतेच मोबाईल व्हॅनसह ईव्हीएम मशीनचे प्रात्याक्षिक दाखविण्यात आले.
आरमोरी (अ.ज.) विधानसभा मतदार संघाअंतर्गत तहसिल कार्यालय, देसाईगंज, आरमोरी,कुरखेडा, कोरची येथे १९ जानेवारी २०२४ पासून ते २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत मोबाईल प्रात्यक्षिक व्हॅनद्वारे (MDV) जनजागृती कार्यक्रम राबविण्याकरीता तहसिल कार्यालय, देसाईगंज येथील सुरक्षा कक्षात ठेवण्यात आलेल्या EVM/VVPAT नियोजित कार्यक्रमानुसार प्राप्त करुन जनजागृती कार्यक्रम राबविण्याकरीता अधिकारी/कर्मचारी यांची या नियुक्ती करण्यात आली आहे.
कुरखेडा तालुक्यात सदर मोबाईल व्हॅनद्वारे ईव्हीएम मशीनची जनजागृती करण्यात येत असून दररोज तालुक्यातील गावामध्ये मोबाईल व्हॅनसह ईव्हीएम मशीनचे प्रात्यक्षिक नागरिकांना देण्यात येत आहे. कुरखेडा तालुक्यातील कुंभिटोला येथे नुकतेच मोबाईल व्हॅनद्वारे ईव्हीएम मशीनची जनजागृती करण्यात आली. यावेळी कुरखेडाचे मंडळ अधिकारी नवले, मंडळ अधिकारी उसेंडी, तलाठी कुंभारे, कुंभिटोला येथील कोतवाल सौ.शिलाबाई इस्कापे, सरपंचा उर्मिला हलामी, राजू मडावी, चंद्रकला गावडे आदी उपस्थित होते.