चंद्रपूर जिल्हयात आज एका मृत्युसह आढळले ११७ नवे बाधित तर ४१५ कोरोनामुक्त

249

– ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या १४५२
The गडविश्व
प्रतिनिधी / चंद्रपूर : गत 24 तासात जिल्ह्यात 415 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 117 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. तर शुक्रवारी जिल्ह्यात एका बाधिताचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 18, चंद्रपूर 15, बल्लारपूर 11, भद्रावती 3, ब्रह्मपुरी 19, नागभीड 10, मुल 1, सावली 5, पोंभूर्णा 4, राजुरा 4, चिमूर 2,वरोरा 11, कोरपना 5 व जिवती येथे 9 रुग्ण आढळून आले असून सिंदेवाही, गोंडपिपरी व इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे. आज मृत झालेल्यामध्ये मुल येथील एका पुरुषाचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 98 हजार 194 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 95 हजार 189 झाली आहे. सध्या 1452 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 50 हजार 172 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 49 हजार 970 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1553 बाधितांचे मृत्यू झाले आहे.
प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here