– कठाणी नदीनजीकची घटना
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०१ : आरमोरी मार्गे गडचिरोलीच्या दिशेने येणारे पिकअप वाहन व गडचिरोली मार्ग आरमोरीकडे जाणाऱ्या दुचाकी वाहनाची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना 31 जानेवारी रोजी रात्रो 8.30 वाजताच्या सुमारास घडली. शुभम राजेंद्र बेहरे (28) रा. गोगाव असे मृतकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभम बेहरे हा रात्रीच्या सुमारास गडचिरोली वरून गोगावकडे दुचाकीने जात होता. दरम्यान आरमोरीवरून गडचिरोलीकडे येणाÚया पिकअप वाहनाची व दुचाकीची कठाणी नदीजवळ समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीस्वार शुभम हा ठार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे.
(the gdv, the gadvishva, gadchiroli news, accident, armori, gogav)