गडचिरोली : बेपत्ता असलेल्या इसमाचा तलावात आढळला मृतदेह

218

The गडविश्व
गडचिरोली, दि. ०१ : शहरातील गोकुळनगर येथील बेपत्ता असलेल्या इसमाचा बाजार जवळील तलावात मृतदेह तंरगतांना आढळून आल्याची घटना 31 जानेवारी रोजी उघडकीस आली. दिलीप कवडू पेटकुले रा. गोकुळनगर असे त्याचे नाव आहे.
दिलीप हा मंगळवार पासून बेपत्ता असल्याची तक्रार गडचिरोली पोलीस ठाण्यात दाखल केली होती. बुधवार 31 जानेवारी रोजी बाजार जवळील तलाव परिसरात काम करणाऱ्यांना तलावात एक मृतदेह तरंगतांना दिसुुन आला. तात्काळ याची माहिती पोलीसांना दिली असता पोलीसांनी याबाबत माहिती दिलीपच्या कुटुंबियांना दिली. कुटुुबियांना दिलीपचा मृतदेह ओळखला. दिलीपने आत्महत्या केली की यामागे काही घातपात आहे हे अदयाप कळू शकले नाही. पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहे.

(the gdv, the gadvishva, gadchiroli news, crime news, gadchiroli police, #thegdv)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here