The गडविश्व
अहेरी : तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय रेपनपली अंतर्गत येत असलेल्या छल्लेवाडा येथील रहिवासी आनंद दुर्गे यांच्या वडिलांचे निधन झाले. घरचा प्रमुख् व्यक्तीचे अचानक निधन झाल्याने कुटुंबावर आर्थिक संकट ओढावल्याने पुढील कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी सांत्वन करत आनंद दुर्गे यांना आर्थिक मदत केली.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे, जि.प.सदस्य अजय नैताम, आविस शहर अध्यक्ष प्रशांत गोडसेलवार, प्रकाश दुर्गे, राकेश सड़मेक,आदि उपस्थित होते.