धानोरा : फुले चौकात पकडला अवैध रेतीने भरलेला ट्रॅक्टर

299

– धानोरा महसूल विभागाची कारवाई
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. ०३ : तालुक्यामध्ये होत असलेली अवैध रेती वाहतूकदारांना आळा घालण्यासाठी महसूल विभाग धानोरा यांनी पूर्णपणे कंबर कसली असून महसूल विभागाने कारवाई करीत २ फेब्रुवारी २०२४ च्या मध्यरात्री १२:१५ वाजता सोडे मार्गावरून धानोरा येथे येत असतांना फुले चौकात रेतीने भरलेला एम.एच- ३३ वी ०९६६ क्रमांकाचा ट्रॅक्टर पकडला.
तालुक्यात अवैधरित्या रेतीची वाहतूक केली जाते. यामुळे महसूल विभागाचा मोठ्य प्रमाणात महसूल बुडत असतांना महसूल विभागाने कठोर कारवाई करणे गरजेचे होते. दरम्यान सोडे येथून होत असलेल्या अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर महसूल विभागाने पकडून केलेल्या कारवाईने अवैध रित्या रेतीची वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
सदर कारवाई केलेला ट्रॅक्टर तहसील कार्यालय धानोरा येथे जमा करण्यात आला आहे. सदर कारवाई धानोराचे तहसीलदार राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार डी.के.वाळके, तलाठी अविनाश कोडापे धानोरा नांदावर अ.का. व त्यांचे सहकारी कोतवाल जीवन आतला चिचोडा यांनी केली. सदर ट्रॅक्टर कोणाच्या मालकीचे आहे हे स्पष्ट झाले नसल्याचे तलाठी यांनी सांगितले तर ट्रॅक्टर चालक हर्षल वाघाडे असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here