गडचिरोलीला कोणी थांबवू शकत नाही, अमर्याद संधीतून आपला विकास करून घ्या

192

– महामॅरेथॉन मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि.०५ : गडचिरोलीला कोणी घाबरवू शकत नाही आणि थांबवू शकत नाही असा संदेश महामॅरेथॉनमध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी तरूणाईने दिला आहे. गडचिरोलीच्या या तरूणाईला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असून आपल्याला मिळत असलेल्या अमर्याद संधीतून आपला व समाजाचा विकास करून घ्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
गडचिरोली महा-मॅराथॉन 2024 – ‘एक धाव आदिवासी विकासासाठी’ या गडचिरोली पोलिस दलाच्या उपक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळी जिल्हा परिषद मैदान येथे उपस्थित होते. यावेळी 3 कि.मी., 5 कि.मी., 10 कि.मी. व 21 कि.मी. मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री यांनी झेंडी दाखवून मॅराथॉन स्पर्धेला सुरूवात करून दिली.
अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक कुमार चिंता, एस रमेश (अहेरी) व प्रतीश देशमुख,(अभियान) तसेच पोलिस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here