हत्तीरोगापासून सुरक्षित राहण्याकरिता प्रत्येकाने गोळ्यांचे सेवन करणे आवश्यक

122

– जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. लोकेशकुमार कोटवार यांचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०६ : हत्तीरोग दूरीकरणाकरिता चामोर्शी व आरमोरी तालुक्यात १० ते २३ फेबुवारी या कालावधीत सामुदायिक औषधोपचार मोहीम सुरु होत असल्याने १०० टक्के लोकांना गोळ्या खाऊ घालण्याचे उदिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना सहसंचालक, आरोग्य सेवा, पुणे यांनी दिलेले आहे. हत्तीरोगापासून सुरक्षित राहण्याकरिता प्रत्येकाने गोळ्यांचे सेवन करणे आवश्यक, दोन्ही तालुक्यातील सर्व नागरिकांनी हत्तीरोग विरोधी गोळ्याचे सेवन करावे व हतीरोगाचे उच्चाटन करावे असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. लोकेशकुमार कोटवार आज झालेल्या पत्रकार परिषदेतून केले.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार १० ते २३ फेबुवारी २०२४ दरम्यान चामोर्शी व आरमोरी या दोन तालुक्यात हत्तीरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत सामुदायिक औषधोपचार मोहीम आशा स्वयंसेविका तसेच आरोग्य कर्मचारी यांचे टिम द्वारे नागरिकांना प्रत्यक्ष हत्तीरोग विरोधी गोळ्या खाऊ घालण्यात येणार आहे. ही दोन्ही तालुके हत्तीरोग जोखीमग्रस्त असल्याने त्याचा संसर्ग रोखण्यासाठी हि मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेतून १०० टक्के नागरिकांना हत्तीरोग विरोधी गोळ्या खाऊ घालण्याच्या दृष्टीकोनातून आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी यांचे द्वारे दिवस पाळीत किवा रात्रो पाळीत जेवण झाल्यानंतर शाळा, महाविद्यालय, ग्रामपंचायत, अंगणवाडी व कार्यालये इत्यादी ठिकाणी बूथ चे नियोजन व गावोगावी गृहभेटी द्वारे प्रत्यक्ष गोळ्या खाऊ घालण्यात येतील.
या पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक अशोक एडलावार, आरोग्य पर्यवेक्षक यांनी व आभार विलास नैताम, आरोग्य सहाय्यक यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here