गडचिरोली : आजपासून जिल्हास्तरीय शालेय बालक्रिडा अधिकारी/कर्मचारी व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन

429

– ७ ते १० फेब्रुवारी पर्यंत रंगणार स्पर्धा
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०७ : जिल्हा परिषद, गडचिरोलीचे विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय बालक्रिडा, अधिकारी कर्मचारी क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा ०७ ते १० फेब्रुवारी २०२४ पर्यंत जिल्हा परिषद मुख्यालय, गडचिरोली येथे आयोजीत करण्यात आले आहे.
याप्रसंगी बुधवार ७ फेब्रुवारी २०२४ ला सकाळी ११ वाजता ना.देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा यांचे शुभहस्ते
व ना.धर्मरावबाबा आत्राम, मंत्री-अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री गोंदीया जिल्हा यांचे अध्यक्षतेखाली उदघाटन समारंभ पार पडणार आहे. यावेळी विशेष अतिथी म्हणून अशोक नेते खासदार, गडचिरोली-चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्र, रामदासजी आंबटकर सदस्य, विधान परिषद, महाराष्ट्र राज्य, अभिजीत वंजारी सदस्य, विधान परिषद, महाराष्ट्र राज्य, सुधाकरजी अडबाले सदस्य, विधान परिषद, महाराष्ट, राज्य, डॉ. देवराव होळी आमदार, गडचिरोली विधानसभा निर्वाचन क्षेत्र, कृष्णा गजबे आमदार, आरमोरी विधानसभा निर्वाचन क्षेत्र, संजय मीणा (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी, गडचिरोली, नीलोत्पल (भा.पो.से.) पोलिस अधिक्षक, गडचिरोली, श्रीमती आयुषी सिंह (भा.प्र.से.), मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली, आर. एम. भुयार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. गडचिरोली, प्रशांत शिर्के प्रकल्प संचालक, डीआरडीए, जि.प. गडचिरोली हे उपस्थित राहणार आहेत.
९ फेब्रुवारी २०२४ ला सायंकाळी ७ वा. शालेय विद्यार्थ्याचे समारोपीय व बक्षिस वितरण समारंभ श्रीमती आयुषी सिंह भा.प्र.से. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली यांचे शुभहस्ते, आर.एम. भुयार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. गडचिरोली प्रशांत शिर्के प्रकल्प संचालक, डीआरडीए, जि.प. गडचिरोली यांचे अध्यक्षतेखाली तथा मा. खाते प्रमुख (सर्व) जिल्हा परिषद गडचिरोली यांचे प्रमुख उपस्थीतीत पार पडणार आहे.
तर शनिवार १० फेब्रुवारी २०२४ ला सायंकाळी ६ वा. अधिकारी/कर्मचारी यांचे समारोपीय व बक्षिस वितरण समारंभ संजय भीणा भा.प्र.से. जिल्हाधिकारी, गडचिरोली यांचे शुभहस्ते, श्रीमती आयुषी सिंह भा.प्र.से.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली यांचे अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. यावेळी विशेष अतिथी म्हणून आर. एम. भुयार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., गडचिरोली, प्रशांत शिर्के प्रकल्प संचालक, डीआरडीए, जि.प. गडचिरोली, धनंजय चापले प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, गडचिरोली, हेमंत ठाकूर मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी, जि.प. गडचिरोली, रविंद्र एस. कणसे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं), जि.प. गडचिरोली, फरेंद्र आर. कुतीरकर प्रकल्प संचालक, जल जीवन मिशन, जि.प. गडचिरोली, श्रीमती ए. के. इंगोले जिल्हा कार्य. अधिकारी, महिला व बाल विकास, जि.प. गड., दावल श्रीहरी साळवे जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. गडचिरोली, चेतन हितंज उप-जिल्हा कार्यक्रम समन्वयक (मग्रारोहयो) जि.प. गडचिरोली, व्हि. एन. दोरखंडे कार्यकारी अभियंता (बांधकाम), जि.प. गडचिरोली, नितिन पाटील कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जि.प. गडचिरोली, सुरेश र. कुंभरे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि.प. गडचिरोली, प्रदिप तुमसरे कृषि विकास अधिकारी, जि.प. गडचिरोली, श्रीमती पुष्पलता आत्राम जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जि.प. गडचिरोली हे असणार आहेत.
जिल्हास्तरीय शालेय बालक्रिडा अधिकारी/कर्मचारी व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी सहभागी होणार असून ही स्पर्धा जिल्हा परिषद प्रांगणात पार पडणार असून विद्यार्थ्यांना, शिक्षकांना या स्पर्धेकरिता प्रोत्साहन देण्याकरिता उपस्थित रहावे असे आवाहन वैभव बोरकर शिक्षणाधिकारी (माध्य) जि. प.गडचिरोली, शेखर शेलार उपमुख्य कार्य अधिकारी (साप्रवि) जि. प.गडचिरोली, विवेक नाकाडे, शिक्षणाधिकारी (प्राथ) जि. प.गडचिरोली यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here