सिखे इंडिया उत्सवाचा काकबन येथून शुभारंभ

217

– चिमुकल्या विद्यार्थ्याने केले पूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
The गडविश्व
चंद्रपूर – जिवती, दि. १० : जि.प. प्राथमिक शाळा, काकबन येथून जिवती तालुक्यातील सीखे इंडिया अंतर्गत असलेल्या TIP कार्यक्रम प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विराट राठोड या छोट्या बालमित्राने केले.
गावात प्रभात फेरी काढून शिक्षणाविषयी घोषणा देवून प्रदर्शनाविषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक रंगराव राठोड, सहाय्यक शिक्षक रामकृष्ण नागरगोजे, सरपंच भारत कोटनाके, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी गणिताचे व भाषा विषयाचे वेगवेगळे मॉडेल, चार्ट, ठेवले होते. माझी शाळा, नंबर बॉण्ड मॉडेल, संख्यारेषा मॉडेल इत्यादी साहित्याने टेबल सजलेले होते. मुलांनी दोन-दोन च्या गटात आपल्या मॉडेल विषयी माहिती सादर केली. यावेळेस पालकांनी उत्साहाने आणि उत्सुकतेने विद्यार्थ्यांना प्रश्नही विचारले. आज या प्रदर्शनाची सुरुवात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काकबन येथून करण्यात आली.
मागील दोन वर्षापासून जिवती तालुक्यात टीचर इनोव्हेटर कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमांतर्गत शिक्षकांना भाषा आणि गणित विषयाच्या विविध पद्धतींचे सिखे संस्थेमार्फत प्रशिक्षण दिल्या जाते. आणि त्यानंतर वर्षभर या शिक्षकांना कोचिंग केले जाते. विद्यार्थी या सर्व पद्धतीचा सराव त्यांना दिलेल्या कार्यपुस्तिकेत करत असतात. वर्षाच्या शेवटच्या सत्रात शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत घेतलेल्या या पद्धतींचे वेगवेगळे मॉडेल बनवून प्रदर्शित करतात.
या प्रदर्शनी कार्यक्रमात चंद्रपूर जिल्हा सीखे समन्वयक हर्षवर्धन डांगे यांनी कार्यक्रमाचे महत्व विषद केले. तसेच कार्यक्रमास लाभलेल्या सरपंच भारत कोटनाके यांनी शाळेत सुरू असलेला TIP कार्यक्रम अतिशय प्रभावी आहे आणि विद्यार्थ्यांस अतिशय उपयुक्त आहे असे सांगितले. कार्यक्रमात ६० विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन विराट राठोड या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी केले. हा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक रंगराव राठोड आणि
रामकृष्ण नागरगोजे आणि जिवती कोच विकास नागोसे, मोहन चुक्काबोटलावांर, सोमेश पेंदाम, आकाश भंडारवार यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here