The गडविश्व
गडचिरोली, दि. ११ : स्थानिक विदर्भ इंटरनॅशनल स्कूल तथा पोद्दार जम्बो किड्स येथे ‘पंचकोश’ या संकल्पनेवर आधारित वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात अतिथीच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. या कार्यक्रमात शाळेचे संस्थापक अध्यक्ष ॲड। संदीप धाईत, शाळेच्या मुख्याध्यापिका निहारिका मंदारे मॅडम, प्रशासकीय अधिकारी प्रीती मुंडे, पूर्व प्राथमिक विभागाच्या समन्वयिका सम्रीन धम्मानी व पालक संघ सदस्य यांनी उपस्थिती दर्शविली.
हे स्नेहसंमेलन केवळ गीत, नाट्य, नृत्य यांचा अविष्कार न राहता ते विचारांचे संमेलन बनले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर भाषण सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रशांति वाघमारे यांनी केले. या स्नेहसंमेलनात पंचकोशावर आधारित विविध नृत्य, नाटिका, गीत, वेशभूषा यांच्या माध्यमातून प्लेग्रुप ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली व पालकांनी सुद्धा उत्साहाने सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे संचालन शाळेचे विद्यार्थी साची लांजेवार, खुशी कुमारी उपाध्याय, न्यासा अंबादे, आराध्य कुंबरे वेदांत कुळसंगे, तनिष्का वाघमारे, वर्निका पुप्पलवार, सुनिधी तेकाम,कुंश रघुवंशी, स्वरा बालमवार, काव्य वनसकर, कल्पक कराडे व शिक्षिका प्रशांति वाघमारे यांनी केले. कार्यक्रमात पालक संघ, विद्यार्थी वर्ग तसेच पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी शाळेच्या प्राथमिक विभागाच्या सांस्कृतिक प्रमुख प्रशांती वाघमारे व संघ, पूर्व प्राथमिक विभागाच्या सांस्कृतिक प्रमुख मेघा कोडापे व संघ, प्रशासकीय कर्मचारी, शिक्षक वृंद, तांत्रिक समर्थक विवेक सोनवणे, नृत्य दिग्दर्शक संगीत वाद्य संघ, संगीत शिक्षक प्रणय मेडपल्लीवर व सपना राऊत, तसेच इतर सर्व शिक्षक कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे आभार शिक्षिका मेघा कोडापे यांनी मानले व सांगता वंदे मातरम ने करण्यात आली. अशा प्रकारे मोठ्या जल्लोषात व उत्साहात विदर्भ इंटरनॅशनल स्कूल तथा पोद्दार जम्बो किड्स येथे स्नेहसंमेलन यशस्वीरित्या स्नेहसंमेलन यशस्वीरित्या पार पडले.