गडचिरोली : शेकापच्या हर घर जोडो अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

398

– शेकडो नागरिकांनी सभासदत्व स्वीकारले
The गडविश्व
गडचिरोली, दि. १३ : शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्रीताई जराते यांच्या नेतृत्वात आजपासून गडचिरोली शहरात हर घर जोडो अभियानाची सुरुवात करण्यात आली. संघर्षनगर येथे या अभियानाचे उद्घाटन जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, राजकुमार प्रधान, यादवप्रसाद कौशल, विनोद लटारे, देवचंद खैरे, संजय बोदलकर, छाया भोयर, विजया मेश्राम, पुष्पा कोतवालीवाले, रजनी खैरे, सुमन परसा प्रामुख्याने उपस्थित होते.
सत्ताधारी भांडवलदारांच्या इशाऱ्यावर हुकूमशाही पद्धतीने वागत आहेत तर प्रमुख विरोधी पक्ष अस्वस्थ आहेत. अशा स्थितीत कष्टकरी जनतेच्या समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आता शेतकरी कामगार पक्षाच्या पक्षाच्या झेंड्याखाली एकत्र येणे हाच पर्याय आहे. पक्ष संगठन भक्कम असेल तर अन्यायाच्या विरोधात आवाज उठवून न्याय मिळवता येतो. आणि भक्कम संगठनाच्या जोरावर हक्क मिळवून घेणे हाच शेतकरी कामगार पक्षाचा इतिहास आहे. त्यासाठीच पहिल्या टप्प्यात हर घर जोडो अभियाना अंतर्गत शहरात पक्ष सभासद नोंदणी करण्यात येणार असल्याचे भाई रामदास जराते यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.
जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, महिला नेत्या जयश्रीताई जराते यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. हर घर जोडो अभियाना अंतर्गत घर भेट देणे सुरू केले असून जनतेने मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. संघर्षनगरातील ४५ कुटुंब आणि स्नेहनगर, लांझेडा येथील शेकडो नागरिकांनी पक्षाचे सभासदत्व स्वीकारले.
यावेळी सोमेश भोयर, सुभाष बावणे, राजकुमार डोंगरे, रविंद्र हजारे, रविंद्र बांगरे, सुनील बन्सोड,ओमेश हजारे, खुशाली बावणे, वेणू लाटकर, धारा बन्सोड, शिल्पा लटारे, कुमारीबाई कौशल, सुमन डोंगरे, विमलबाई क्षीरसागर, सुमन सोनटक्के, सरस्वता भोयर, शालू आभारे, सुशिला नैताम, आकाश आत्राम, सुरज ठाकरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here