The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. १४ : निरंकारी सद्गुरू माता सुदिक्षा सविंदर हरदेवसिंहजी महाराज यांचा एकता, विश्वबंधूता, सूख, शांती व अंतरमनाची द्विधा दूर करण्याचा संदेश घेत महात्मा गुलाबरावजी धूर्वे तालुक्यात ३ दिवस ठिकठिकाणी आध्यात्मिक सत्संग द्वारे संदेश देणार आहेत.
संत निरंकारी मंडळ दिल्ली शाखा कुरखेडाद्वारे भरनोली येथे सोमवार १९ फेब्रूवारी रोजी, सोनसरी येथे मंगळवार २० फेब्रूवारी रोजी तर पलसगड येथे बुधवार २१ फेब्रूवारी रोजी जामणी वर्धा येथील महात्मा गुलाबरावजी धूर्वे यांच्या सानिध्यात आध्यात्मिक सत्संग सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्संगाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन संत निरंकारी मंडळ शाखा कुरखेडच्या वतीने करण्यात आले.