– विविध कार्यक्रमांची रेलचेल
The गडविश्व
गडचिरोली, दि. १८ : रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त उद्या १९ फेब्रुवारी रोजी गडचिरोली शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्या जाते. दरवर्षी भूमी एम्पायरच्या सौजन्याने शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल पहावयास मिळत असते. यंदाही भूमी एम्पायरच्या सौजन्याने भूमिवीर फाउंडेशनच्या वतीने उद्या १९ फेब्रुवारी रोजी भूमी एम्पायर हेड ऑफिस गडचिरोली येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या जयंती सोहळा निमित्त जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
असे असतील कार्यक्रम
सकाळी ०८.०० वाजता, पूजा व महाआरती
सकाळी १०.०० वाजता, रक्तदान शिबिर उदघाटन
सकाळी ११.०० वाजता, मसाला भात वाटप
दुपारी १२.०० वाजता, भजन
दुपारी ०४.०० वाजता, सांस्कृतिक कार्यक्रम
सायं. ०६.०० वाजता, छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य शोभायात्रा
रात्री ०८.०० वाजता, सूरज वनकर यांचे “शिवाजी महाराजांचे अनुभव व नियोजन” या विषयावर व्याख्यान
रात्री ०९.०० वाजता, सहभोजन व आभार आणि कार्यक्रमाची सांगता.