The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. २१ : शहर विचार मंच कुरखेडा, गट ग्रामपंचायत गोठणगांव व आशा हॉस्पिटल नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गोठणगांव येथे मोफत ह्रदयरोग व अस्थीरोग तपासणी तथा औषधोपचार शिबीराचे आयोजन रविवार २५ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे.
शिबीरात नागपूर येथील तज्ञ डॉक्टरांच्या चमूद्वारे ह्रदयरोग, अस्थीरोग, कॅंसर,ईसीजी, शूगर, बिपी तसेच मुत्र, मुत्रपींड व मुत्रमार्ग विकार तपासणी, महालॅब यांचा वतीने ह्रदय संबंधित रक्त तपासणी व औषधोपचार करण्यात येणार आहे तसेच जिल्हा परीषद शाळा गोठणगांव येथील सर्व विद्यार्थांची रक्तगट व सिकलसेल तपासणी सूद्धा करण्यात येणार आहे. यावेळी ह्रदयरोग असलेल्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज असल्यास आयुष्मान योजने अंतर्गत त्या रुग्णांची सर्व आधुनिक सेवेने युक्त असलेल्या रुग्णालयात मोफत शस्त्रक्रियेची व्यवस्था करण्यात येणार आहे. शिबीराचा लाभ परीसरातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन शहर विचार मंचाचे अध्यक्ष माधवदास निरंकारी, वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश बोरकर, गोठणगांवचे सरपंच संतोष हिचामी, उपसरपंच राम लांजेवार यांनी केले आहे.