– पोलीस दलाने १३ गुन्ह्यात केला होता जप्त
The गडविश्व
गडचिरोली, दि.२३ : अंमली पदार्थ नाश समितीने गडचिरोली घटका अंतर्गत येणाया विविध पोलीस स्टेशन मधील अंमली पदार्थासंदर्भात दाखल असलेल्या विविध १३ गुन्हयातील जप्त केलेला तब्बल ४०७ किलो गांजा २२ फेब्रुवारी रोजी नष्ट केला.
पोलीस अधीक्षक निलोत्पल यांचे अध्यक्षतेखाली अंमली पदार्थ नाश समिती गठीत करण्यात आली आहे. पोस्टे गडचिरोली येथील ४ गुन्हे, पोस्टे असरअल्ली येथील २ गुन्हे, पोस्टे अहेरी येथील ३ गुन्हे, पोस्टे चामोर्शी, धानोरा, मुलचेरा, उपपोस्टे रेपनपल्ली येथील प्रत्येकी १ गुन्हे अशा एकूण १३ गुन्ह्रातील एकुण ४०७.०९५ कि.ग्रॅ. अंमली पदार्थ (गांजा) जप्त करण्यात आला होता.
अंमली पदार्थ नाश समितीचे अध्यक्ष पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा., सदस्य अपर पोलीस अधीक्षक (अभियान). यतिश देशमुख सा., प्र. पोलीस उप अधीक्षक (मुख्या.) गडचिरोली विश्वास जाधव, तसेच पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली. उल्हास पी. भुसारी, न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा नागपुर येथील सहा. रासायनिक विश्लेषक, विलास शिवाजी ठानगे, वजन मापे विभागाचे प्रतिनिधी निरीक्षक प्रकाश ऊके, जिल्हा परिषद गडचिरोली येथील पंच लाचुलु मडावी, अक्षय राऊत यांचे उपस्थितीत सदर गांजा नष्ट करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षकनीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख सा. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी, मपोउपनि सरीता मरकाम, स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस अंमलदार नरेश सहारे, दिपक लेनगुरे, प्रेमानंद नंदेश्वर, शुक्राचारी गवई, राकेश सोनटक्के, हेमंम गेडाम, सुनिल पुठ्ठावार, माणिक दुधबळे, उमेश जगदाळे, माणिक निसार, मनोहर टोगरवार यांनीे पार पाडली.
(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #12exam #hscexam #gadchirolinews )