रांगी येथे संत गाडगेबाबा जयंती साजरी
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि.२५ : तालुक्यातील रांगी येथे २३ फेब्रुवारी २०२४ ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा रांगी येथे संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेतील उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्रीमती अंजुम शेख, प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती चांगले, शिक्षक जंगी, दोडके, बोरसरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन इयत्ता सातवीचा विद्यार्थी ईशांत मेश्राम यांनी केले. या निमित्ताने कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास दोडके यांनी केले तर संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर आधारित मुलांनी भाषण दिले. शिक्षक जांगी, चांगले व शेख यांनी संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर काही निवडक प्रसंग सांगून तर शेख यांनी गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे भजन गाऊन कार्यक्रमाची सांगता केली. आभार चौथ्या वर्गाची विद्यार्थिनी तनूशी पोलजवार हिने मानले.