– संत निरंकारी चॅरीटेबल फाउंडेशनचा उपक्रम
The गडविश्व
गडचिरोली, दि.२५ : येथील कठानी नदीवर स्मशान घाटाची स्वच्छता संत निरंकारी चॅरीटेबल फाउंडेशनच्या वतीने रविवार २५ फेब्रुवारी रोजी करण्यात आली.
भारत सरकारच्या सास्कृतिक मंत्रालय द्वारा आयोजित “प्रोजेक्ट अमृत” अंतर्गत दरवर्षी भारतभर संत निरंकारी चॅरीटेबल फाउंडेशन द्वारा संपूर्ण देशभर ‘स्वच्छ जल- स्वच्छ मन’ उपक्रम राबविण्यात येते. ज्यात पाण्याचे महत्व ओळखून पाण्याचे स्त्रोत स्वच्छ करण्याचे कार्य संतजण व मंडळाचे सेवादल बंधू-भगीनी करतात. “स्वच्छ जल, स्वच्छ मन आओ संवारे, यमूना किनारे” सत्गुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या उपस्थितीत रविवार २५ फेबुवारी २०२४ रोजी साळी ११.०० छट घाट दिल्ली येथे मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आलया व त्याचाच भाग म्हणून देशभरातील शहरात जलस्त्रोत, जलस्त्रोत्राचा परिसर, तलाव, सरोवर, नदी इ. ठीकाणी स्वच्छता करण्यात आली.
त्याप्रीत्यर्थ गडचिरोली शहरालगत असलेल्या कठानी नदिवर स्मशान घाट ची स्वच्छता करण्यात आली. सकाळी ७.०० ते ११ वाजता दरम्यान हा उपक्रम राबविण्यात आला. यात जवळपास १५०-२०० सेवादल बंधूभगीनी सहभागी झाले होते. स्वच्छता कार्य सुरु करण्यापूर्वी जनजागृती करण्यासाठी इंदीरा गांधी चौकातून बाईक रॅली काढण्यात आली.
कठानी नदीघाटावर स्वच्छता कार्यक्रमादरम्यान प.पू. किशनजी नागदेवे, झोनल इंचार्ज वडसा झोन यांनी सदिच्छा भेट देऊन उपस्थित सर्व बंधू भगिनींना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता गजानन तुंकलवार मुखी गडचिरोली, राजेश गुंडेवार, संचालक लोमेश मेश्राम, सेवादल व संगतचे सदस्यांनी सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.