– डांबरीकरण करण्यास बांधकाम विभागाची यंत्रणा उदासी
The गडविश्व
ता..प्र / धानोरा, दि. २५ : तालुक्यातील रांगी ते बेलगाव पर्यंतचा ६ किमी. रस्त्याचे डांबरीकरण पूर्णतः उखडले असून या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. परिणामी खड्ड्यामुळे या मार्गावर गेल्या काही दिवसापासून अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे.
रांगी ते बेलगाव-गडचिरोली या मार्गावर वाहनाची नेहमी मोठी वर्दळ असते. गडचिरोली हे जिल्ह्याचे एकमेव ठिकाण असल्याने या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनांचे आगमन सुरू असते. गडचिरोली येथील जिल्हा कार्यालयाला कामाकरिता व त्या ठिकाणी बँक महाविद्यालय बरेचसे मोठे ऑफिस विविध कामासाठी रांगी परिसरातील नागरिक व विद्यार्थी याच मार्गाने गडचिरोलीकडे ये जा करतात मात्र रांगी ते बेलगाव पर्यंत सहा किमी सदर मार्गाची प्रचंड दुरवस्था झाल्याने या मार्गावरील प्रवास धोकादायक झालेला आहे. तात्पुरता थातूरमातूर डागडुजी करू नये, सदर मार्गाच्या दुरुस्तीच्या कामाकडे लोकप्रतिनिधीसह संबंधित यंत्रणेचेही प्रचंड दुर्लक्ष झाले असून सदर मार्गाची पक्की दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी रांगी परिसरातील नागरिकांनी केली आहे.