कोरची : मालवाहू ट्रकची झाडाला जबर धडक

582

-चालक जखमी
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा- कोरची, दि. २७ : कोरची वरून चिल्हाटी छत्तीसगडकडे जात असलेला सीजी ०४ एमजी ६७३२ क्रमांकाचा मालवाहू ट्रक कोरची येथील वनश्री शाळेसमोर रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जबर धडक बसून अपघात झाल्याची घटना मंगळवार २७ फेब्रुवारी रोजी घडली.
सदर अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रकचालक किरकोळ जखमी झाला आहे.
कोरची येथून छत्तीसगढ ला दररोज मोठ्या प्रमाणात मालवाहू ट्रक ची ये-जा सुरू असते. अशातच मुख्य मार्गावर शाळा, महाविद्यालय असल्याने विद्यार्थ्यांचीही लगबग असल्याने नेहमीच वर्दळ असते. मालवाहू ट्रकमुळे अनेकदा अपघातही झाले आहे. अशातच मात्र आज शाळेसमोर असलेल्या झाडाला ट्रकची जबर धडक बसून अपघात झाला. सुदैवाने शाळेतील विद्यार्थी परिसरात वावरत नव्हते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here