मुनघाटे महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

170

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. २९ : स्थानिक धानोरा येथील श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धानोरा येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज चव्हाण हे अध्यक्षस्थानी होते तर डॉ. राजू किरमिरे, डॉ. दामोदर झाडे, डॉ. हरीश लांजेवार, डॉ. संजय मुरकुटे, प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते डॉ. सी व्ही. रमण यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज चव्हाण यांनी विज्ञान ‘शाप की वरदान’ या विषयावर विस्तृत असे मार्गदर्शन केले तसेच इतर मान्यवरांनी विज्ञानामुळे होत असलेली प्रगती सोबतच विज्ञानाच्या अतिरेकामुळे होणारे दुष्परिणाम यावर भाष्य करून वैज्ञानिक दृष्टिकोन जागृती बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि विज्ञान सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाचे संचालन कुमारी सोनम अलाम व कुमारी लिकिता सोनुले यांनी केले तर आभार कुमारी करीना वरवाडे हिने मानले. या कार्यक्रमासाठी वरिष्ठ तथा कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, सर्व प्रशासकीय कर्मचारी व महाविद्यालयीन सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here