The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. ०४ : तालुक्यातील मोहली येथील मॉडेल स्कूलचे मुख्याध्यापकांनी वर्ग दहावीला शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्याला बोर्ड परिक्षेचे प्रवेशपत्र न दिल्याने विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती खराब होऊन परीक्षेपासून वंचित ठेवणाऱ्या, विद्यार्थीचे नुकसान करणाऱ्या मुजोर मुख्याध्यापकावर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे.
सविस्तर वृत्त, मॉडेल्स स्कूल मोहली येथील शाळेत रांगी येथिल विद्यार्थी गिरीधर शिवराम कुंमरे यांचा मुलगा मॉडेल स्कूल मोहली या शाळेमध्ये सन २०२३-२४ या सत्रात इयत्ता दहावीला शिक्षण घेत आहे. वर्षभर शिक्षण सुरू असताना त्याने इयत्ता दहावीच्या बोर्डाचा परिक्षा फार्म भरला. सदर विद्यार्थी डब्लू एस.सिकलसेल असुन त्याची प्रकृती चिंताजनक असते. वेळोवेळी त्याला त्रासा होत असते. अशातच त्याला रक्त द्यावे लागते. याची कल्पना शिक्षकांना होतीच. अशा परिस्थित शाळेत जाने शक्य नव्हते. परंतु आता बोर्डाच्या परीक्षे करिता शाळेतील इतर विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र देण्यात आले. पण अर्पण गिरीधर कुंमरे या विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र दिलेच नाही. विद्यार्थाने मागणी करुन सुद्धा त्यानंतर त्यांचे वडील आज ४ मार्च २०२४ रोजी मराठीचा पहिला पेपर असताना पालक स्वता मुख्याध्यापकाकडे प्रवेश पत्र मागणीसाठी गेले. मुख्याध्यापकाला विनवणी केली पण तुमच्या मुलाची उपस्थिती कमी भरत असल्याने प्रवेशपत्र देवू शकत नसल्याचे आपबिती पालकाने सदर प्रतिनिधी जवळ व्यक्त केले. मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याचे हॉल तिकीट देण्यास नकार दिला आणि पालकाला खाली हात निराश होऊन परतावे लागले. एकंदरीत परिस्थिती बघता मुख्याध्यापकांचा मनमानी कारभार दिसून येते. विद्यार्थ्यांला परीक्षा प्रवेश पत्र न देण्याची ही हेखेखोरवृत्ती असून बोर्डाने यांना एवढा अधिकार दिला का ? हॉलतिकीट रोखण्याचा अधिकार त्यांना आहे का? त्यामुळे सदर विद्यार्थ्यांचे नुकसान भरपाई मुख्यध्यापक करून देतील का ? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहेत. सदर मुख्याध्यापकावर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.
सदर मुख्याध्यापकांचा मनमानी कारभार असून अशा पद्धतीचे हॉल तिकीट रोखल्यामुळे जर त्या मुलाचे आयुष्य बरबाद होऊन मानसिक दडपणाखाली आत्महत्या केल्यास त्याला सर्वस्वी मुख्याध्यापक जबाबदार धरण्यात यावे. याला सर्वस्व जबाबदार मुख्याध्यापकाला धरून संबंधित मुख्याध्यापकावर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे.
मोहली येथील एन.एस.नैताम मुख्याध्यापक यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क केला असता विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी असून असाइन्मेंट सादर न केल्यामुळे प्रवेश पत्र नाकारले असल्याचे सांगितले.