मुलींच्या सक्षमीकरणसाठी लेक लाडकी योजनेची सुरुवात

137

The गडविश्व
गडचिरोली, दि.०४ : महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागमार्फत गडचिरोली जिल्हयात १ एप्रिल, २०२३ पासून जन्माला आलेल्या मुलींच्या सक्षमीकरणसाठी “लेक लाडकी” ही योजना राबविण्यात येत आहे. ०१ मार्च २०२४ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. गडचिरोली यांचे उपस्थितीत जिल्हा आरोग्य अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथ.), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं. बा.क.) आणि जिल्हयातील १२ ही तालुक्याचे बाल विकास प्रकल्प अधिकारी व अंगणवाडी पर्यवेक्षिका यांची आढावा घेऊन सदर योजनेचा लाभ जिल्हयातील तळागळातील १ एप्रिल २०२३ पासून जन्मलेल्या सर्व मुलींना लाभ देणेबाबत निर्देश दिले. सदर अर्ज गाव पातळीवर संबंधित अंगणवाडी सेविकाकडे सादर करावयाचे आहे.

योजनेचे निकष : पिवळया व केसरी शिधापत्रिकाधारक असावा. कुटूंबाचे उत्पन्न रुपये १.०० लक्ष चे आत असावे.

लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांचे बॅक खाते असणे आवश्यक आहे.

योजनेचे उद्देश : मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, बाल विवाह रोखणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे, शाळाबाहय मुलींचे प्रमाणे कमी करणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here