अहेरी येथे महिला व बाल विकास विभागाचा कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न

186

The गडविश्व
गडचिरोली,दि.०४ : अभय केंद्र, संरक्षण अधिकारी कार्यालय महिला व बालविकास विभाग अहेरीच्या वतीने २९ फेब्रुवारी २०२४ रोजी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ या विषयावर एक दिवसीय कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षा श्रीमती ॲड. डंबोळे, विधी सेवा प्राधिकरण, अहेरी तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती एच. एम. कन्नाके पर्यवेक्षिका अहेरी, भामरागडचे संरक्षण अधिकारी बी. डी. पिपरे, अहेरीचे संरक्षण अधिकारी एम. व्ही. मारगोनवार, ॲड. रूपाली माकडे, ॲड. ज्योती ढोके, ॲड. रवीना खोब्रागडे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्रीमती कन्नाके यांनी कायद्याअंतर्गत महिलांचे हक्क व अधिकार या विषयावर मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा ॲड. डंबोळे यांनी कायद्याअंतर्गत महिलांसाठी असलेल्या विविध आदेश कायद्यातील वकिलांची भूमिका तसेच या व्यतिरिक्त हुंडा प्रतिबंधक कायदा, कलम ४९८ अ, कलम १२५ व इतर महिला विषयक कायद्यावर सखोल मार्गदर्शन केले. पिपरे यांनी कायद्याची रूपरेषा व कायद्याचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले तर या कायद्यातील यशस्वीतेसाठी एस. पी. भांडेकर, रेखा निम्राड तसेच इतर सहकाऱ्यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here