आलापल्ली-चंद्रपूर मार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात

290

– चारजण गंभीर जखमी
The गडविश्व
अहेरी : आलापल्ली-चंद्रपूर मार्गावर ट्रक आणि कारची समोरासमोर धडक बसून भीषण अपघात झाल्याची घटना काल सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात कार चा चुराडा झाला असून कारमधील चार जण गंभीर जखमी झाल्याची महिती समोर येत आहे. गंभीर जखमींना रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. रणजीत दुर्गे, चेतन, अमरदीप,मारोती असे अपघातात जखमी झालेल्ल्यांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, आल्लापल्ली मार्गे चंद्रपूर कडे ट्रक जात होते दरम्यान धनूर-लगाम च्या वळणावर भरधाव ट्रक ने कारला धडक दिली. यात कारचा चुराडा झाला तर कारमधील चारजण गंभीर जखमी झाले. यातील एकाला अहेरी उपजिल्हा रुग्णलयात दाखल केले तर इतर तिघाना ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे दाखल केले असता तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथे पुढील उपचाराकरिता रेफर करण्यात आल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here