The गडविश्व
गडचिरोली, दि. ०६ : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथील रसायनशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. केशव बैरागी यांच्या अँटी टी.बी. एजेंट या शीर्षकाला अमेरिकन पेटंट घोषित झाले. रोग प्रतिबंधात्मक उपाय आणि त्यावरील संशोधनाचा व्याप बघता त्यांना हे पेटंट घोषित करण्यात आले आहे.
याप्रसंगी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखन, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. अनिल चिताडे तसेच रसायनशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रशांत ठाकरे यांच्यासह विविध विभागाच्या प्राध्यापकांनी त्यांच्या यशाचे कौतुक केले.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gondwanauniversity #zadibolinatysamelan #anty_TB_agent #Dr.KeshavBairagi)