-दैनिक नवराष्ट्रचे शहर प्रतिनिधी कैलास उईके यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार
The गडविश्व
नागपूर, दि. ०७ : दिशा बहुउद्देशीय संस्था नागपूर तथा महाराष्ट्र लाईव्ह न्युज वतिने आयोजित, महाराष्ट्र प्रेरणा पुरस्कार 2024 यात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दैनिक नवराष्ट्रचे शहर प्रतिनिधी कैलासजी उईके यांचा गौरव करून महाराष्ट्रातील हास्य बॉलीवूड अभिनेते भारत गणेशपुरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला लोहित मतानी पोलीस अधिक्षक भंडारा, अँड.किशोर लांजेवार, चेतन भैरव अध्यक्ष मराठी पत्रकार संघ भंडारा, मार्कण्डराव भेंडारकर बांधकाम कामगार कल्याण मंडळ, शशिकांत भोयर मुख्य संपादक महाराष्ट्र लाईव्ह न्युज तसेच राज्यप्रतिनिधी संजय मानकर,भास्कर झोडे उपस्थित होते.
विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार समारंभ सामजिक न्याय भवन जिल्हा परिषद चौक भंडारा येथे पार पडले. कार्यक्रमाचे आभार रशीद कुरेशी यांनी मानले.