दुःखद : स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड

310

– वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
The गडविश्व
मुंबई : भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. या बातमीने संपूर्ण सिनेविश्वासात शोककळा पसरवली आहे. महिनाभरापासून त्यांचे चाहते आणि कलाकार त्यांच्या प्रकृतीसाठी सतत प्रार्थना करत होते.
ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा बिघडली होती. सुरुवातीला त्यांना कोरोना आणि न्यूमोनियामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होतं. त्यानंतर काही दिवसांनी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समोर आले. त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले होते.
८ जानेवारी रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून लता दीदी आयसीयूमध्ये होत्या. प्रकृती पुन्हा एकदा खालावल्यानंतर त्यांना तातडीने व्हेंटिलेटरवर हलवण्यात आलंले होतं. डॉक्टरांचे पथक त्याच्यावर 24 तास लता दीदींवर लक्ष ठेवून होते.
रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here