The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि.०९ : तालुक्यातील रांगी येथे बुधवार ६ मार्च २०२४ रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रांगी येथे सेवानिवृत्ती पर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला .या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती म्हणून यु व्हि. परशुरामकर निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी तथा त्यांचा सपत्नीक सोहळा आयोजित करण्यात आला.
सदर कार्यक्रमाला शशिकांत जी साळवे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती गडचिरोली तथा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नरेंद्रजी भुरसे तसेच उपाध्यक्ष श्रीमती प्रभाताई काटेंगे, तसेच गावच्या प्रथम नागरिक सरपंचा श्रीमती फालेश्वरीगेडाम ह्या उपस्थित होत्या. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य पटले, दासग, दासगाये, आरसोडे अर्जुनी मोरगाव व त्यांच्या पत्नी ह्या सुद्धा या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होत्या.
सदर कार्यक्रम पीएमसी शाळा रांगी यांच्या तर्फे शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांनी आयोजित केलेला होता. निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी परशुरामकर यांनी आपल्या जीवनामध्ये शिक्षण विषयी केलेल्या कार्याचा उजाळा या कार्यक्रमातून मनोगतातून सर्वांसमक्ष उलगडीत केला तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. शाळेच्या शिक्षिका चांगले, मुख्याध्यापिका अंजुम शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक काटेंगे यांनी केले कार्यक्रमाचे संचलन दोडके यांनी केले. जांगे सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले शेवटी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाने सर्वांच्या मनोगत आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.