The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. १३ : तालुक्यातील कटेझरी पोलिस स्टेशन अंतर्गत ११ मार्च रोजी पोलीस अधीक्षक निलोत्प, अप्पर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक(अभियान) देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी एम रमेश सा. यांचे संकल्पनेतून व उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस दादालोरा खिडकीचे माध्यमातून महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी, त्यांचे कलागुणांना वाव मिळण्यासाठी व शासकीय योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बेबी मडावी भव्य महीला मेळावा कटेझरी येथे आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ.उमेश धुर्वे, प्राथमिक आरोग्य केंद्र मुरूमगाव, कार्यक्रमाचे उद्घाटीका कु.पल्लविताई कोल्हे सरपंचा कटेझरी ग्रामपंचायत, प्रभारी अधिकारी जनक वाकणकर पो.स्टे. कटेझरी तसेच प्रमुख पाहुणे सौ.एस.जी.पदा प्रा.आ.उप केंद्र कटेझरी, सौ.गीता मेश्राम योगा शिक्षिका कटेझरी,धनेश हलामी लहान झेलिया, बारसाय गावडे रा.गुरेकसा, गणसु कोल्हे रा.कटेझरी, सिदुराम तुलावी गावपाटील रा.चारवाही, घसियाराम गोटा रा.लहान झेलिया, रामसू अचला रा.भटमर्यांन, नामदेव पदा रा. दराची
पोउपनि प्रदीप साखरे, परी.पो.उप.नि विशाल नल्लावर व एस आर पी एफ चे पोलीस उपनिरीक्षक एम.के.राठोड तसेच जिल्हा पोलीस अंमलदार व SRPF अंमलदार यांनी कार्यक्रमास उपस्थित होते.
महिला मेळाव्याची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व भगवान बिरसा मुंडा यांचे प्रतिमेचे पूजन करुन सुरुवात करण्यात आली. प्रभारी अधिकारी जनक वाकणकर यांनी प्रास्ताविक सादर केले. त्यामध्ये त्यांनी पोलीस दादालोरा खिडकीचे माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांची माहिती दिली. महिला सक्षमीकरण करण्यासाठी पोलीस दलामार्फत महिलांकरिता राबविण्यात येणारे विविध प्रशिक्षण व उपक्रम याबद्दल ची माहिती दिली. तसेच आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोणत्याही भूलथापांना बळी न पडता पारदर्शकपणे मतदान करण्याचे आवाहन केले. तसेच मावोवादी विचारसरणी पासून सर्व नागरिकांना दूर राहण्याचे आवाहन केले.
त्यानंतर मेळाव्यातील उपस्थित गरजू महिलांना साडीचे वाटप व पुरुषांना धोतर तसेच मछरदानीचे वाटप करण्यात आले.
सदर मेळाव्यात नागरिकांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तसेच नवीन आभा कार्ड, आयु्यमान कार्ड, ईश्रम कार्ड काढून देण्यात आले.
१) अधिवास प्रमाणपत्र-०३
२)जातीप्रमाणपत्र- ०२
३) आयुष्यमान कार्ड नोंदणी- ०५
४) ईश्रम कार्ड- ०१
५) आभा कार्ड – ०८
६) साडी – ४०
७) धोतर – २३
८) मच्छरदाणी – २४
महिला मेळाव्याकरिता पोस्टे हद्दीतील २५०-३०० महिला, पुरुष व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते . मेळाव्या दरम्यान आरोग्य शिबीर ठेऊन नागरिकांची आरोग्य बाबत तपासणी करण्यात आले. व योगा शिक्षिका मेश्राम कटेझरी यांनी योगा बाबत मार्गदर्शन करून उपस्थित नागरिकांना योगासनाचे धडे शिकवले.
उपस्थित सर्व नागरिकांना उत्तम व रुचकर जेवण
देण्यात आले. व प्रभारी अधिकारी जनक वाकणकर पो.स्टे.कटेझरी यांचे आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. मेळावा शांततेत पार पडण्याकरिता ज़िल्हा पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच SRPF चे अधिकारी व अंमलदार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच मेळाव्याचे सुत्रसंचालन पो.हवा.गोविंद उईके यांनी केले.