The गडविश्च
मुंबई: आज ६ फेब्रुवारी रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे मुंबईच्या ब्रीच कॅंडी रूग्णालयात वयाच्या 92 व्या वर्षी दुःखद निधन झाले. लता मंगेशकर यांच्या निधनाने गृह मंत्रालयाने आज 6 व उदया 7 फेब्रुवारी रोजी देशभरात दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. तसे पत्र सर्व राज्य सरकारचे मुख्य सचिव आणि केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक यांना देण्यात आले आहे. यानुसार दोन दिवस राष्ट्रध्वज आर्ध्यावर खाली घेतला जाईल. लतादीदींच्या पार्थिवावर मुंबईत शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.