माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप

266

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. १५ : येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय येथे ११ मार्च ते १४ मार्च पर्यंत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाला गट साधन केंद्राचे सहारे हे अध्यक्ष होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. कैलास खोब्रागडे पवार उपस्थित होते. 2020 नवीन शैक्षणिक धोरण येत्या नवीन सत्रा पासून लागू होणार असून त्यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना तीन दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमात शिक्षकांनी विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून अध्ययन करताना कशा पद्धतीने केले पाहिजे याविषयी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये कृती कार्यक्रमावर भर देण्यात आले आहे. यादरम्यान जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष भाषणातून सहारे यांनी व्हिडिओ चर्चा, गटचर्चा या माध्यमातून शिक्षकांना सहभागी करून घेतले. हे शिक्षण भविष्यवेधी शिक्षण असणार आहे, विद्यार्थ्यांना देण्यात येणारे शिक्षण हे कृतीतून देण्यात यावे तसे शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा वापर करून तंत्रस्नेही शिक्षक बनले पाहिजे असे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला प्रशिक्षक म्हणून मोहिते, प्रा. कैलास खोब्रागडे कुलसंगे, फुंडे, गजभिये यांनी प्रशिक्षण दिले.
कार्यक्रमाचे संचालन जामलीवार मॅडम यांनी केले तर आभार फुंडे मॅडम यांनी मानले. प्रशिक्षण ला माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here