-आगामी लोकसभा निवडणूक तसेच होळी सणाच्या पार्श्वभूमीवर कारवाई
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. १८ : स्थानिक पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तालुक्यातील मौशी जंगलपरीसरात व झरीनाला जंगल परीसरात अवैध मोहफुल हातभटी दारुभट्टीवर धाड टाकून दारु व मोहफुल सडवा जप्त केल्याची कारवाई रविवार १७ मार्च रोजी करण्यात आली.
आगामी लोकसभा निवडणूक तसेच होळी सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू व्यावसायिक जंगलाचा फायदा घेऊन हातभट्टी च्या साहाय्याने दारू तयार करीत असल्याने याबाबतची माहिती कुरखेडा पोलिसांना मिळाली. दरम्यान माहितीच्या आधारे स्वतः पोलीस निरीक्षक सिगनजूडे हे पोलीस स्टॉप सह रवाना होवून जंगलपरीसरात शोच मोहीम राबविली असता मौशी जंगलपरीसरात व झरीनाला जंगल परीसरात अवैध मोहफुल हातभटी दारु व मोहफुल सडवा मिळून आला. दोन्ही घटनास्थळावरुन २४ हजार ७०० रुपयाचा मोहफुल सडवा तसेच १० हजार रुपयाची हातभटटी मोहफुलाची दारु असा एकुण ३४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच तिन्ही आरोपीतांविरुध पोस्टे कुरखेडा येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
तसेच मागील तिन चार दिवसात कुरखेडा शहरात व परीसरात कढोली, चिखली, गेवर्धा गोठनगाव येथे शोध मोहीम राबवून अवैध दारुविक्रेत्यावर कार्यवाही करुन गुन्हे दाखल होत आहेत. सदर कार्यवाही पोस्टे कुरखेडाचे ठाणेदार रेवचंद सिगनजूडे यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक दयानंद भोंबे, महिला पोलीस उपनिरीक्षक वर्षा बोरसे, महिला पोलीस उपनिरीक्षक शितल आवचार, पोहवा शेखलाल मडावी, मपोशि किरण मडावी, पोशि प्रकाश साबडे, पोशि/नरसिंग कोरे, पोशि अंकेश शिरसाठ यांचे पथकाने केलेली आहे.