कुरखेडा : अवैध रेती तस्करीच्या ट्रॅक्टरचा अपघात, चालक जागीच ठार

1614

The गडविश्व
देसाईगंज, दि.१९ : तालुक्यातील मोहटोला येथे अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात होऊन चालक जागीच ठार झाल्याची घटना आज पहाटे ०५.०० वाजताच्या दरम्यान मोहटोला येथिल जि.प.शाळे जवळ घडली.
प्राप्त माहितीनुसार, चिखली येथील अवैध रेती तस्कर योगेश शेंद्रे हा ट्रॅक्टरने रेतीची अवैध रित्या तस्करी करीत असतांना मद्यधुंद अवस्थेत असलेल्या ट्रॅक्टर चालकाने मोहटोला येथील जि.प.शाळेच्या भिंतीला जबर धडक दिली. या अपघातात चालक राकेश गजबे रा. पोटगांव ता. देसाईगंज याचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरला नंबरप्लेट नव्हते. तर सदर प्रकरण प्रकरण सावरण्याकरीता अवैध रेती तस्करांने हालचाली सुरु केल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या आशिर्वादाने मोहटोला घाटातून दररोज अवैध रेती तस्करी केल्या जाते परंतु मलिन्दा मिळत असल्याने अधिकारी वर्ग सुध्दा याकडे दुर्लक्ष करतात तर OBC साठी आताच १५ दिवसापूर्वी प्रत्येक गावात जवळपास २५ ते ३० घरकुल मंजूर झाल्याने त्यांना अद्यापही शासनाने रेतीची पूर्तता केली नाही त्यामुळे त्यांना चोरीची रेती घेतल्या शिवाय पर्याय नाही. अश्यानांही शासनाने रेती दिली असती तर तसेच अधिकाऱ्यांनी तस्करांच्या मुसक्या आवळल्या असत्या तर सदर अपघात घडला नसता अशी मोहटोला व परिसरात चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here