गडचिरोली : इंदिरा गांधी चौकात भारतरत्न लता मंगेशकर यांना वाहिली श्रध्दांजली

736

The गडविश्व
गडचिरोली : आज गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांचे सकाळच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपुर्ण देश हळहळलला. आज गडचिरोली शहरातील इंदिरा गांधाी चौकात महाराष्ट्र माझा न्यूज, प्रेरणा मास्क बॅंक व श्री साई बॅंड गडचिरोली यांच्यावतीने भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी प्रथम लता मंगेशकर यांचे ऐ मेरे वतन के लोगोए हे गाणे बॅड पथकाव्दारे वाजविण्यात आले त्यानंतर २ मिनिट मौन पाळून श्रध्दांजली वाहनण्यात आली. समारोप लता दीदींच्या आवाजातील राष्ट्रगीताने करण्यात आला.
यावेळी गडचिरोली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, वाहतूक पोलीस, पोलीस विभागातील इतर कर्मचारी, महाराष्ट्र माझा न्यूजचे संपादक कैलाश शर्मा, The गडविश्व चे संपादक सचिन जिवतोडे, श्रीसाई बॅंड पथकाचे संचालक व बॅंड पथकातील सर्व सभासद तसेच इतर नागरिक मोठया संख्येन उपस्थित होते.
दरम्यान लता दीदींच्या निधनाने देशभरात दोन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आले आहे तसेच राज्यसरकारच्या वतीने उद्या राज्यभरात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here