-घराचे व जनावरांचे नुकसान
The गडविश्व
ता.प्र /धानोरा, दि. २१ : तालुक्यामध्ये १९ मार्च ला सायंकाळी चार वाजताच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी पावसाने धानोरा तालुक्यातील रब्बी पिकांना, पशु पक्ष्यांना, घरांना शाळेला मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसलेला आहे. यामुळे धानोरा तालुक्यातील जनतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सदर नुकसानीचे वेळीच पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी तालुक्यातील जनतेने केली आहे.
तालुक्यामध्ये मोठ्या वादळ वाऱ्यासह गारपीट मोठ्या प्रमाणात झाली. दूधमाळा येथील मनोज शेडमाके यांच्या शेतातील टमाटरचे पीक पूर्णपणे उध्वस्त झाले. शेतातील पाईप फुटले, याचबरोबर अनेक शेतकऱ्यांची विविध प्रकारची हानी झाली. तसेच या गारपिटीने मुक्या जनावरांना सुद्धां सोडले नाही. तालुक्यातील येरंडी येथील भजनराव जगुजी गावडे यांच्या मालकीची गाय चक्रीवादळ पावसासह गारपिटीमुळे मृत्युमुखी पडली. यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना अचानक उद्भवलेल्या समस्या ने शेतकरी हवालदिल झाले आहे.
पावसाचा तडाखा एवढा जोरदार होता की गारपिटीने दुधमाळा येथील काही पक्षी सुद्धा मृत्युमुखी पडले तसेच अवकाळी पावसाने व सोबत गारपीटीने दुबार पीक घेणारे शेतकरी व भाजीपाला घेणारे शेतकरी यांच्या पिकाची मोठे नुकसान झाले त्यामुळे ते संकटात सापडले आहेत. मिचगाव बुजरुक येथिल जिल्हा परिषद शाळेवरील टिन पडले. त्यामुळे शाळेत शिकणाऱ्या मुलांची अडचण निर्माण झाली आहे. अक्षरशा टिन वाकुन खाली पडलेल्या आहेत. अवकाळी पावसाने परिसरातील उन्हाळी धान पिकाला सुद्धा यांचा फटका बसलेला आहे.
धानोरा तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे लवकरात लवकर पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. एकंदरीत या अवकाळी पावसाने व गारपिटीने पीक, पशुपक्षी, ईमारत,
धान्य पिक, घरांची नासधूस, कच्च्या विटांचे नुकसान अशा सर्वांना मोठा फटका बसला आहे.