-मानव विकास मिशन अंतर्गत मिळाला लाभ
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. २३ : तालुक्यातील लिसिट हायस्कूल तथा ज्युनिअर कॉलेज रांगी येथील बाहेर गावावरून येणाऱ्या विद्यार्थिनींना मानव विकास मिशन अंतर्गत मोफत सायकलचे वाटप करण्यात आले. त्यामुळे आता सावित्रीच्या लेकीचा प्रवास सुकर झाला आहे.
शाळेपासुन ०५ कि.मि. अंतरावरुण ये-जा करणाऱ्या विद्यार्थिनींना मानव विकास अंतर्गत मोफत सायकलचे वाटप शासनाच्या वतीने केल्या जाते. लिसिट हाँयस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय रांगी येथील मुलींचे प्रस्ताव शासनाकडे सादर केले. त्याचा पाठपुरावा केल्यानंतर ७ सायकल प्राप्त झाल्या. मुलींना शाळेत ये-जा करण्यासाठी साधन उपलब्ध झाले. त्यामुळे वेळच्या वेळी शाळेत येण्यासाठी सोईस्कर झाल्याने मुलींनी समाधान व्यक्त केले.
सायकलचे वितरण करताना शाळेचे प्राचार्य एस.जी. मोरांडे, सौ.वच्छलाताई साईनाथ हलामी ग्रा.पं.सदस्या रांगी, प्रतिष्ठित नागरिक आत्माराम मनकू हलामी, प्रा. आनंद झोळे, प्रा. करिश्मा मेश्राम, प्रा.पवन राऊत, गभणे,अनुकूल शेंडे, कु. अंजली जुमळे, सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.