निवडणूक काळात जप्त केलेल्या रकमेसंदर्भात जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत

188

The गडविश्व
गडचिरोली दि. २३ : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ चा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर १२-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात आदर्श आचारसंहिता तात्काळ प्रभावाने अंमलात आली आहे. या पार्श्वभुमीवर निवडणूक काळात रोख रक्कम व इतर मौल्यवान वस्तु जप्त करणे किंवा सोडणे यासाठी मानद कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे.
या प्रक्रियेदरम्यान पोलिस विभागाकडे एफ. आय. आर. किंवा तक्रार दाखल न करता कोषागारामध्ये रक्कम किंवा इतर मौल्यवान वस्तु ठेवल्याप्रकरणी संबंधित व्यक्तिंना होणारा त्रास कमी करणे, प्राप्त तक्रारींचे निराकरण करणे, अशा प्रकारची कार्यवाही करतांना मानद कार्यपध्दतीचा काटेकोर अवलंब करणे, अन्य बाबींची छाननी / पडताळणी करणे इत्यादी कामांसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी जिल्हास्तरावर जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत केली आहे.
सदर समितीमध्ये जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अध्यक्ष असून जिल्हा कोषागार अधिकारी हे सदस्य आहेत. तर निवडणूक खर्च परिक्षण व व्यवस्थापन पथकाचे नोडल अधिकारी तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी हे सदस्य सचिव आहेत. जप्त करण्यात आलेली रोख रक्कम सोडणे / सुपूर्द करणे बाबत निवडणूक खर्च परिक्षण व व्यवस्थापन पथकाचे नोडल अधिकारी यांनी निर्देशांचे तंतोतंत पालन करून अभिलेखाचे जतन करावे. निवडणूक काळामध्ये लोकप्रतिनिधीत्व अधिनियमातील तरतुदीनुसार कार्य करण्याचे आदेशात नमुद आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #election2024 #loksabhaelection2024)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here