-राखी, गुरवळा येथील महिलांचा पुढाकार
The गडविश्व
गडचिरोली, दि. २७ : स्थानिक पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राखी येथील दारूविक्रेत्यांवर कारवाई करून दारूबंद करावी, अशी मागणी करीत विक्रेत्यांची यादी राखी व गुरवळा येथील महिलांनी सादर केली आहे. यासंदर्भातील निवेदन गडचिरोली पोलिस स्टेशनला सादर करण्यात आले आहे.
राखी येथील दारूविक्रेत्यांवर कारवाई करून गावात शांतता व सुव्यवस्था टिकून राहावी, यासाठी राखी व गुरवळा गाव संघटनेच्या माध्यमातून गडचिरोली पोलिसांकडे चारवेळा तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार गडचिरोली पोलिसांनी विक्रेत्यांवर कारवाई केली. तरीसुद्धा काही विक्रेते पोलिस कारवाईला सुद्धा न जुमानता अवैध व्यवसाय करीत आहेत. गाव संघटनेला सुद्धा न जुमानता गावातील काही विक्रेते सर्रास दारूविक्री करीत आहेत. परिणामी गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. त्यामुळे दारूविक्रेत्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी महिलांनी केली आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #muktipath)