– घटनास्थळावरून साहित्य जप्त
The गडविश्व
गडचिरोली, दि. २८ : गडचिरोली जिल्ह्याच्या व छत्तीसगडच्या कांकेर सीमेवर पोलीस नक्षल चकमक रात्रोच्या सुमारास उडाली. या चकमकीत पोलिसांचा वाढता दबाव बघता नक्षली घटनस्थळावरून पसार झाले.पोलिसांनी घटनास्थळी झडती घेतली असता नक्षल्यांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
गडचिरोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कसनसूर चातगाव दलम आणि छत्तीसगडच्या औंधी दलमचे काही सशस्त्र कॅडर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपात करण्याच्या उद्देशाने उपपोलीस स्टेशन कसनसूर पासून उत्तर पूर्वेस १५ किमी व पोस्टे जारवंडी पासून दक्षिण पूर्वेस १२ किमी अंतरावर असलेल्या महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील भुमकन गावाजवळ तळ ठोकून आहेत अशी गुप्त माहिती काल २७ मार्च रोजी दुपारी मिळाली असता अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या नेतृत्वाखाली ताबडतोब नक्षलविरोधी ऑपरेशन सुरू करण्यात आले. आठ सी-६०, १ सीआरपीएफचे क्यूएटीसह जंगल परिसरात शोध घेत असतांना नक्षल्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. जवानांनीही प्रत्युत्तर देत गोळीबार केला. हि चकमक रात्रभर सुरूच होती होती. दरम्यान नक्षल्यांनी BGL ने गोळीबार केला त्याला जवानांनाही जोरदार प्रत्युत्तर दिले. पोलिसांचा वाढता दबाव बघता अंधाराचा फायदा घेत नक्षली पळून गेले. सकाळी घटनास्थळी झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात नक्षल्यांचे सामान, साहित्य, वायर्स, जिलेटिनच्या काठ्या, बॅटऱ्या, सोलर पॅनल इत्यादी जप्त करण्यात आले. परिसरात अद्यापही नक्षलविरोधी अभियान सुरूच असून पुढील कारवाई गडचिरोली पोलिसांकडून सुरू आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #Gachirolipolice #naxal #gadchirolipolice )
————————————————————————————-
Exchange of Fire with Maoists on Gadchiroli Kanker Border
A credible Int was received yesterday afternoon that some armed cadres of Kasansur Chatgaon Dalam and Aundhi Dalam of CG are camping on MH CG Border near Bhumkan village (15 km north east of SPS Kasansur, 12 km south east of Jarawandi P.S.) to carry out subservise activities in light of upcoming Lok Sabha Elections.
Immediately an anti Naxal Ops was launched under leadership of Addnl SP Admin Kumar Chinta, 8 C60 parties and 1 QAT of CRPF. While area search was being done, they were fired indiscriminately by Naxals which was retaliated strongly by Ops team.
Firing continued intermittently through out the night with heavy firing at 1800 hrs, 2330 hrs yesterday and 0430 hrs today in very poor visibility at night. Naxals fired BGL’s which was retaliated strongly by Ops team. Sensing mounting pressure and taking cover of darkness, Naxals fled from the firing spot.
Area search on first light today morning led to seizure of large amount of naxal belongings, literature, wires, gelatin sticks, batteries, solar panels etc. Anti Naxal Operation is continuing in the mentioned area. Further developments will be updated by Gadchiroli Police.