The गडविश्व
कोरची, दि. २८ : गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असली तरी छुप्या मार्गाने दारूची विक्री केली जाते. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या कोरची तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या गावांमध्ये हातभट्टी लावून दारू गाळली जाते. तालुक्यातील बेतकाठी येथे हातभट्टी सुरू असल्याची माहिती मिळताच गाव संघटना व मुक्तिपथ तालुका चमूने हातभट्टी उध्वस्त करीत अवैध दारूविक्री न करण्याची तंबी दिली.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath #korchi)