रॅलीच्या माध्यमातून दारू विक्रेत्यांना वार्निंग

127

The गडविश्व
गडचिरोली, दि. २९ : तालुक्यातील डोंगरगाव येथील अवैध दारूविक्रेत्यांना वारंवार सूचना देऊनही त्यांनी आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला. त्यामुळे नुकतेच मुक्तिपथ व गाव संघटनेची बैठक पार पडली. या बैठकीत दारूमुक्त गाव निर्माण करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे ठरविण्यात आले. सोबतच गावातून रॅली काढून अवैध व्यवसाय बंद करण्याची वार्निंग दारू विक्रेत्यांना देण्यात आली.
डोंगरगाव येथे अनेक वर्षांपासून दारू बंद होती. परंतु मागील 3 ते 4 वर्षापासून दारू सुरू आहे. परिणामी लोकांचे आरोग्य धोक्यात आल्याने, युवकांमध्ये वाढलेले व्यसन व शांतता-सुव्यवस्था धोक्यात आल्याने दारू बंदीसाठी गाव संघटन गठीत करून दारू बंदीच प्रयत्न केला. परंतु दारू विक्रेते मुजोर असल्याने दारू विक्री सुरू राहिली. गावात दारू बंदीसाठी पदाधिकारी, महिला, युवक एकत्र येत दारू बंदीचा निर्णय घेतला. दारू विक्रेत्याची दारू नष्ट करणे व पोलीस कार्यवाही कारणे, दारू विक्रेत्याच्या कार्यक्रमाला न जाणे उदा. लग्न, मरणाला व इतर कार्यक्रमाला सहभागी न होणे, शेती कामावर न. जाणे, दारू विक्री बंद न केल्यास ग्रामपंचायत कडून मिळणारे कागदपत्र न देणे असे कठोर निर्णय घेण्यात आले. त्यांनतर गावातून रॅली काढून अवैध व्यवसाय बंद करण्याचे आवाहन करण्यात आले.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here