The गडविश्व
गडचिरोली, दि. ३१ : देसाईगंज तालुक्यातील ग्रामपंचायत विसोरा अंतर्गत कुणीही दारूविक्री करणार नाही, विक्री करताना आढळून आल्यास दंडात्मक कारवाईसह विक्रेत्यास पोलीस विभागाच्या स्वाधीन करण्याचा निर्णय ग्रापं समितीने घेतला आहे. यासंदर्भातील नोटीस दारूविक्रेत्यांना देण्यात आले आहे.
गावात अवैध दारूविक्री होत असल्याने महिला, पुरुष, शाळकरी विद्यार्थी यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. तसेच गावात झगडे भांडण नेहमी होत असून गावात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित होण्याच्या दृष्टिकोनातून यापूर्वी दारूविक्रेत्यांना वारंवार तीन नोटीस बजावण्यात आले होते. परंतु, विक्रेत्यांनी आपला अवैध व्यवसाय बंद न केल्याने ग्रापं सभेच्या ठरावाची अंमलबजाणी करीत विसोरा ग्रापंने विक्रेत्यांना नोटीस बजावून तत्काळ दारूविक्री बंद करण्याची सूचना केली. तरीसुद्धा कुणाकडे दारू आढळून आल्यास पहिल्यांदा दंड पाच हजार, दुसऱ्यांदा १० व तिसऱ्यांदा २० हजार रुपये दंड व दंडाची रक्कम न भरल्यास तेवढ्या किमतीची वस्तू जप्ती पंचनामा तसेच दारूबंदी कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची सूचना नोटीसच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
(#thegdv #muktipath #gadchirolinews)