शासकीय कामात अडथळा निर्माण करुन किरकोळ जखमी करणा­ऱ्या मायलेकीस कारावास

1189

गडचिरोली येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आशुतोष नि. करमरकर यांचा न्यायनिर्वाळा
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०१ : शासकीय कामात कामात अडथळा निर्माण करुन किरकोळ जखमी करणा­ऱ्या मायलेकीस दोन महिने कारावास व प्रत्येकी १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १० दिवस वाढीव शिक्षा गडचिरोली येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आशुतोष नि. करमरकर यांनी ठोठावली आहे. रजनी रामचंद्र आत्राम (वय 47), शितल रामचंद्र आत्राम ( वय 26) दोघेही रा. गांधीवार्ड, देसाईगंज असे आरोपींची नावे आहेत.
पोलीस स्टेशन देसाईगंज येथील मपोउपनि. सोनम नाईक हे आपले हद्दीतील मपोउपनि. सुजाता भोपळे व पोस्टे स्टाफसह प्रोव्ही रेड कामी २७ ऑक्टोबर २०२१ रोजी देसाईगंज शहरात पेट्रोलींग करीत असतांना गांधीवार्ड देसाईगंज येथील आरोपी रजनी रामचंद्र आत्राम च्या घरी अवैधरीत्या देशी विदेशी दारुची विक्री करते अशी गोपनिय सुत्रांकडुन माहिती मिळाल्याने पंचांना प्रोव्ही रेड बाबत माहिती देऊन, पंचांसमक्ष घराची झ्डती घेत असतांना आरोपी शितल आत्राम हिने माझ्या आईला दोन मुली पोसायचे आहेत म्हणुन माझी आई दारु विकते, हे माझे घर आहे तुमचे पोलीस स्टेशन नाही असे म्हणून एकाएकी मपोउपनि. सोनम नाईक यांच्या अंगावार येऊन दोन्ही हात पकडुन शोकेस आलमारीकडे ढकलत नेले व मान खाली दाबुन मानेवर बुक्यांनी मारले. त्यावेळी सोबत असलेली मपोउपनि. सुजाता भोपळे यांचे दोन्ही हात पकडुन खाली ढकलुन दिले. तेव्हा पोलीस स्टाफ व पंचांनी समजाविण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा आरोपी मायलेकींनी आरडाओरड करुन अश्लिल शब्दात शिवीगाळ केली. याप्रकरणी पोलीस स्टेशन देसाईगंज येथे २७ ऑक्टोबर २०२१ रोजी अप क्र. 579/2021 अन्वये कलम 353,332,504,34 भादवी अन्वये गुन्हा दाखल करुन आरोपी मायलेकीस २८ ऑक्टोबर २०२१ रोजी १४.०२ वा अटक करुन, तपास पूर्ण करुन आरोपी विरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्याने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करुन सेशन केस क्र. 38/2022 नुसार खटला सत्र न्यायालयात चालवून, फिर्यादी पंच व ईतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्र धरुन आज १ एप्रिल २०२४ रोजी आरोपी मायलेकीस जिल्हा व सत्र न्यायाधीश आशुतोष नि. करमरकर गडचिरोली यांनी कलम 353, 34 भादवी मध्ये दोषी ठरवून २ महिने कारावास व प्रत्येकी १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १० दिवस वाढीव शिक्षा ठोठावली.
सरकार पक्षातर्फे सहा. जिल्हा सरकारी वकील सचिन यु. कुंभारे यांनी कामकाज पाहिले, तसेच गुन्ह्राचा प्रथम तपास सपोनि. राजेश गावडे पोस्टे देसाईगंज यांनी केला. तसेच संबंधीत साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गती करीता सेशन कोर्ट पैरवी अधिकारी व अंमलदार यांनी कामकाज पाहिले.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #crimenews #loksabhaelection2024 #districtcort #desaiganj )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here