कोरची : धनंजय स्मृती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सावित्रीच्या लेकींना सायकलचे वाटप

452

-शिक्षणाचा प्रवाह होणार सुखर
The गडविश्व
ता. प्र. / कोरची‌-कुरखेडा, दि.०२ : गावात माध्यमिक शिक्षणाची सोय नसल्यामुळे दुसऱ्या गावी शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या मुलींना वेळेत शाळेत मुलींना शिक्षण घेता यावे यासाठी कोरची तालुक्यातील देऊळळभट्टी येथील धनंजय स्मृती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात १० सावित्रीच्या लेकींना सायकल देऊन त्यांचा शिक्षणाचा प्रवाह सुखर केला आहे.
बाहेर गावावरून ये-जा करणाऱ्या मुलींचे गळतीचे प्रमाण कमी व्हावे या उदात्त हेतुने मानव विकास मिशन योजने अंतर्गत जिल्हा परिषद शिक्षण विभाग माध्यमिक गडचिरोली मार्फत कोरची तालुक्यातील धनंजय स्मृती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवुळभट्टी येथे इयत्ता आठवी ते बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या बाहेर गावच्या १० गरजु मुलींना मोफत सायकलचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी धनंजय स्मृती विद्यालयाचे, देवुळभट्टी‌ गावातील पोलीस पाटील ओमप्रकाश कार्यपाल, श्रीमती.रमसीलाबाई कोरेटी,‌ सौ.सरस्वती चिंगार, प्राचार्य एम.बी.मुंगमोडे, महेंद्र बोगा, ओमप्रकाश धुर्वे, राकेश गायकवाड, गणेश मुंगलमारे, नमुदेव गायकवाड, रामानंद‌ मिरी, दिनेश बघवा तथा शाळेतील संपूर्ण शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #korchi #kurkheda #deulbhatti #dhanjayasmurtividyalay #loksabhaelection2024 )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here