“दोन पैशाची दारू घेऊन आपले अमुल्य मत देऊ नका”

211

-मुक्तीपथद्वारे जागृती
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०३ : मुक्तिपथ द्वारे गाव व वार्ड संघटनेच्या माध्यमातून अवैध दारू विक्रीबंद करण्यासाठी विविध प्रकारे व्यापक प्रयत्न केले जात आहे. अशातच निवडणूक आल्या कि, दारू वाटप होण्याची संभावना व यामुळे दारूविक्रीबंदी गावात पुन्हा दारू सुरु होण्याची शक्यता निर्माण होत असते. याच हेतूने मुक्तिपथ द्वारा गडचिरोली जिल्ह्यात २०१९ मध्ये लोकसभा, विधानसभा निवडणुका दारूमुक्त निवडणुका करण्यासाठी विविध जागृती कार्यक्रम केल्या गेले. निरोगी लोकशाही साठी निवडणूक दारूमुक्त होणे आवश्यक आहे.
याच आधारावर २०२४ ची होणारी लोकसभा निवडणुक दारूमुक्त निवडणुक करण्यासाठी विविध पद्धतीने जाणीवजागृतीचे कार्यक्रम मुक्तिपथ द्वारा बाराही1 तालुक्यात करणे सुरू झाले आहे. निवडणूक आचारसंहिता नियमानुसार शासनाच्या स्वीप कार्यक्रम व मुक्तिपथ यांचेद्वारे संयुक्त पद्धतीने जाणीवजागृती कार्यक्रम केले जाणार आहे. गावात व वार्डात सभा घेऊन जनेतला दारूमुक्त निवडणुकीसाठी आवाहन करण्यात येत आहे.
“हि लोकसभा निवडणूक दारूमुक्त निवडणूक” “दारू पिवून मतदान करू नका” “दोन पैशाची दारू घेऊन आपले अमुल्य मत देऊ नका” “जो पाजील माझ्या नवऱ्याला दारू त्या उमेदवाराला नक्कीच पाडू” अशा विविध आशयाचे बॅनर1 लावण्यात आले आहे, मुक्तिपथ चित्ररथ द्वारा Audio संदेश, माहितीपत्रक गावात व मोहल्ल्यात दिले जात आहे. गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी टिकून राहावी, मजबूत व्हावी यासाठी निवडणूक दारूमुक्त करा. हि आपली सर्वांची जबाबदारी आहे. प्रत्येक मतदाराने संकल्प करावा कि मतदान दारूमुक्त व शांततेत होण्यासाठी मी दारू स्वीकारणार नाही, पिणार नाही व पूर्णपणे जागरूक राहून मतदान करेन. निवडणूक काळात किंवा मतदानाच्या दिवसी गावात मोहल्यात दारूवाटप होतांना आढळल्यास पोलीस विभागाला कळवावे, दारूचा वापर होऊ नये यासाठी सर्वांनीच पाळत ठेवावी. अशा विविध पद्धतीने आवाहन व जागृती करत, होणारी लोकसभा निवडणूक दारूमुक्त निवडणूक व्हावी यासाठी कृती केल्या जात आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchiroli #muktipath #loksabhaelection2024)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here