गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात २४ हजार नवमतदार, पुरुष मतदारात भर

154

The गडविश्व
गडचिरोली दि. ५ : गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात १८ ते १९ वयोगटातील २४ हजार २६ नवमतदारांनी नोंदणी केली आहे यात १३ हजार २६१ पुरुष तर १० हजार ७६४ महिलांचा समावेश आहे.
१२-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघातील आमगाव , आरमोरी, गडचिरोली, अहेरी, ब्रम्हपुरी आणि चिमुर हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. या विधानसभा मतदारसंघातील १८ ते १९ वयोगटाच्या नवमतदारांची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

आमगाव – १७१५ पुरुष आणि १३६५ महिला, एकूण ३०८०
आरमोरी- १८४८ पुरुष आणि १५४४ महिला एकूण ३३९२
गडचिरोली – २७८४ पुरुष आणि २२८७ महिला एकूण ५०७१
अहेरी – २१०२ पुरुष आणि १५०९ महिला व एक तृतियपंथी असे एकूण ३६१२
ब्रम्हपुरी – २४५८ पुरुष आणि २०२३ महिला एकूण ४४८१
चिमुर – २३५४ पुरुष आणि २०३६ महिला एकूण ४३९० मतदारांनी नोंदणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here