दारूमुक्त व पारदर्शक निवडणुक करून गाव विकासाला गती द्या

131

– गावागावात बैठकीच्या माध्यमातून मुक्तिपथ व गाव संघटनेचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०५ : लोकसभा निवडणूक दारूमुक्त व्हावी, यासाठी मुक्तिपथ व गाव संघटनेच्या वतीने गावागावात बैठक लावून लोकांना जागृत केले जात आहे. प्रत्येक मतदाराने संकल्प करावा कि मतदान दारूमुक्त व शांततेत होण्यासाठी मी दारू स्वीकारणार नाही, पिणार नाही व पूर्णपणे जागरूक राहून मतदान करणार असे आवाहन करीत दारूमुक्त निवडणुकीचा ठराव पारित केला जात आहे. सोबतच गावाने पारित केलेल्या ठरावाची प्रत ग्रामपंचायत बाहेर लावली जात आहे. हा उपक्रम जिल्हाभरात सुरू आहे. आतापर्यंत चामोर्शी तालुक्यातील १२ व गडचिरोली तालुक्यातील ५ गाव, एका वार्डात बैठक घेऊन दारूमुक्त व पारदर्शक निवडणुक करून गाव विकासाला गती देण्याचे आवाहन मुक्तिपथ ने केले आहे.
चामोर्शी तालुक्यातील मुरखला चक, नागपूर चक, नवीन वाकडी, नवतला, लाल डोंगरी , वेलतुर तुकुम, वाघोली, मुरखळा माल, सगणापुर, रामसगर, तलोधी, मालेर माल या गावांमध्ये बैठक घेऊन दारूमुक्त निवडणुकीचा ठराव पारित करण्यात आला. यावेळी मुक्तिपथ चे तालुका संघटक आनंद इंगळे, उपसंघटक आनंद सीडाम, प्रेरक विनोद पांडे यांनी ग्रामस्थांना ग्रामस्थांना दारूमुक्त निवडणुकीची संकल्पना पटवून दिले. पूर्ण शुद्धीत राहून मतदान करता येते, योग्य उमेदवार निवडता येते. गावाची दारूबंदी टिकून राहते, मजबूत होते. मतदानाच्या काळात भांडणे शक्यतो होत नाही. शांततेच्या वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडते. विकासासाठी निवडून दिलेल्या उमेदवाराला जाब विचारता येतो. हे दारूमुक्त निवडणुकीचे फायदे असून दारूमुक्त निवडणूक न झाल्यास अनेक नुकसान दिसून येतात. दारू पिवून आढळल्यास पोलीस केस होऊ शकते. पाच वर्षासाठी चुकीचा उमेदवार निवडला जाऊ शकतो. आपल्या गावात पुढे दारू सुरु होऊ शकते. फुकटची व जास्तीची दारू पिल्यामुळे अचानक मृत्यू होऊ शकतो. मतदान काळात भांडण / मारामारी होण्याची संभावना असते. हे नुकसान देखील मुक्तिपथ तालुका टीमने सांगितले.
गडचिरोली तालुक्यातील नवरगाव, कुराडी, मेंढा, बोदली माल, बोदली तुकुम तसेच गडचिरोली शहरातील रामनगर येथे दारूमुक्त निवडणूक ठराव घेण्यात आला. मुक्तिपथ चे तालुका संघटक रेवनाथ मेश्राम यांनी निवडणुकीसाठी उभा राहणारा उमेदवार गाव व जिल्हा दारूबंदीचा समर्थन करणारा असावा. स्वतः दारू पिणारा नसावा, निवडणुकीच्या पुर्व काळात व निवडणुकीच्या दिवशी दारू वाटप न झाल्यास निवडणूक शांततेत पार पडणार, जो दारू वाटप करेल त्याला आम्ही मत देणार नाही. दारूच्या नशेत मतदान करून अयोग्य उमेदवार निवडला जाऊ नये, याची काळजी घ्यावी. असे मार्गदर्शन केले. त्यानंतर गावकऱ्यांच्या /वॉर्डातील रहिवाशांच्या वतीने घेण्यात आलेले दारूमुक्त निवडणुकीचे ठराव गावातील सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आले. गावात पोस्टरच्या माध्यमातून ज्याला दारू बंदी नको , तो उमेदवार आम्हाला नको., जो पाजील माझ्या नवऱ्याला दारू त्या उमेदवाराला नक्कीच पाडू, दोन पैसाची दारू घेऊन,आपले अमूल्य मत देऊ नका., ही निवडणुक दारू मुक्त निवडणूक .ह्या घोषवाक्यांनी जाणीव जागृती केली जात आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here