कुरखेडा : शेततळ्यात बुडून इसमाचा मृत्यू

887

The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि.०५ : शेतशिवारात असलेल्या शेततळ्यात बुडून इसमाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी कुरखेडा तालुक्यातील पळसगांव शेतशिवारात उघडकीस आली. जीवन उईके (43) रा. चिनेगाव असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त महितीनुसार, चिनेगांव येथील मृतक जीवन उईके हे गुरुवारी सायकलने काढोली येथे काही कामानिमित्त गेले होते. रात्र होऊनही ते घरी परत न आल्याने कुटुंबाने त्यांचा शोध घेतला मात्र कुठेही ते आढळून आले नाही. शुक्रवारी पुन्हा सकाळी शोधमोहीम राबविली असता पळसगाव शेतशिवारातील शेततळ्याजवळ त्यांची सायकल आढळून आली. त्यावरून संशय निर्माण झाल्याने शेततळ्यात पाहणी केली असता त्यांचा मृतदेह आढळून आला. मृतकास फिट मिरगी चा आजार असल्याचे कळते. मृतकास शौच क्रीयेनंतर फीटचा झटका आल्याने ते पाण्यात पडत बूडाले असावे असा कयास लावण्यात येत आहे. घटनेची माहीती मिळताच कुरखेडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व शव उत्तरीय तपासणी करीता कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनेचा पुढील तपास ठाणेदार रेवचंद सिंगनजूडे यांचा मार्गदर्शनात सहाय्यक पो.नि. दिनेश गावंडे, हवालदार शेखलाल मडावी करीत आहे.
(#thegdv #kurkheda #gadchirolinews #gadchirolipolice #kadholi #loksabhaelection2024 )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here